आहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील महत्वाचा बीडपर्यंतचा टप्पा पुर्ण झाल्यानंतर आता रेल्वे परळीच्या दिशेने जाऊ लागली आहे. बीड ते वडवणी या ३१ किमी अंतराच्या हायस्पीड रेल्वे चाचणीला आज सुरूवात झाली आहे. बीड येथील रेल्वे स्थानकातून वडवणीच्या दिशेने निघालेली रेल्वे आज दाखल झाली. तेथून पुढे शिवणी स्थानकावर हायस्पीडचा अंतीम टप्पा असलेल्या वडवणी स्थानकापर्यंत पोहोचलीसुरक्षिततेच्या अनुषंगाने ट्रॅक आणि ब्रिजची टेस्टींग करण्यात आली असुन बीड ते वडवणी हे ३१ किमीचे अंतर हाय स्पीड चाचणीने पार केले