कमकाझरी येथील साधु कोंडकुजी बांते यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात शिरून वाघाने वासराची शिकार केल्याची खळबळजनक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघ वासराची शिकार करत असताना गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने आरडाओरड करून वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे वाघाने शिकार केलेली वासरू जवळच असलेल्या शेतशिवारात टाकून पळ काढला.