गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन बोरखेडे यांनी 10 जानेवारीला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. या आरोपीवर आधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने महागडे मोबाईल व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन बोरखेडे यांनी दिली