छत्रपती संभाजीनगर-वंचित ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने ओबीसी समाजाला सामाजिक न्याय देण्याकरिता व ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ओबीसी समाजातील घटकांचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढून बिंदू नामावलीची चौकशी करण्यात यावी वंचित ओबीसी समाजातील घटकांना शिक्षण व नोकरीमध्ये विशेष हक्क द्या.