धरणगाव तालुक्यातील पाळधी गावामध्ये एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.