आज दिनांक १७ डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली गंगापूर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर मिळावेत यासाठी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून वेळेत सोयी-सुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या या आंदोलनामुळे महसूल विभागातील अनेक महत्त्वाची कामे ठप्प झाली असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.