बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पंडितराव रामराव देशमुख तसेच प्रभागातील सर्व अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला यावेळी आमदार श्वेताताई महाले,सह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.