भोकरदन: पारध येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पोलीस ठाण्याच्या वतीने घेण्यात आली मॅरेथॉन स्पर्धा
आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजता भोकरदन तालुक्यातील पारध येथे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 3 किलोमीटर मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेत परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी व स्पर्धकांनी सहभाग घेतला यावेळी विजेतांना पोलिसांच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात आले.