खालापूर: कर्जत अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक
कर्जत येथे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या शाळेच्या बसमधील अल्पवयीन मुलींवरील झालेल्या लैंगिक शोषणाच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी करण पाटील (रा. वदप) याच्यावर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, आणि पीडित मुलींना तात्काळ न्याय मिळावा, अशी मागणी आज कर्जत-खालापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.१९) रोजी कर्जत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस न