मुर्तीजापूर: जांबा खुर्द येथील ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत माजी सरपंच राजु वानखडे यांचे तहसील परिसरात उपोषण सुरु
जांभा खुर्द येथील इ क्लास जमीनीवरील अतिक्रमण तात्काळ काढा तालुक्यातील जांभा खुर्द येथील इ क्लास जमीनीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे यासाठी जांभा खुर्द येथील माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य राजू साहेबराव वानखडे यांनी सोमवार २७ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता पासुन साखळी उपोषणास सुरुवात केली असून जो पर्यंत इ क्लास जमीनीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात येणार नाही तो पर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे अशी माहिती माजी सरपंच राजु वानखडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली .