गुरुवार दिनांक ८ जानेवारीला दुपारी पंचायत समिती रामटेक येथे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीची अध्यक्षता राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी केली. त्यांनी जलजीवन मिशन योजना, बोरवेल व पाणी टाकी यासह सर्व पाणीपुरवठा योजनांच्या अपूर्ण कामांची सविस्तर माहिती घेतली. संबंधित यंत्रणांनी ही सर्व कामे तातडीने पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.