दारव्हा: दारव्हा नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर, महिलांसाठी मोठी संधी
आगामी दारव्हा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण दि. ८ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता दरम्यान जाहीर करण्यात आले असून यंदा महिलांसाठी मोठ्या प्रमाणात जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नगरपरिषदेतील एकूण जागांपैकी जवळपास अर्ध्या जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे.