महाड: गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद..खराब हवामानामुळे मेरीटाइम बोर्डाचा निर्णय..@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 26, 2025 खराब हवामानाचा फटका जलवाहतूक सेवेला बसलाय. गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा काल संध्याकाळ पासूनच बंद करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर रायगडच्या किनाऱ्यांवर तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यांमुळे लाटांचा मारा वाढला आहे. त्यामुळे ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मेरी टाइम बोर्डाने घेतलाय.