थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार(ता,२८)रोजी शहरातील सर्व थरातील नागरिक यांनी महात्मा जोतिबा फुले पुतळा परिसरात एकत्र येत महात्मा जोतिबा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .शिव-फुले-शाहू-आंबेडकर समिती व अखिल भारतीय समता परिषद यांनी आयोजित या कार्यक्रमात प्रामुख्याने आमदार प्रा.रमेश पा,बोरनारे,डॉ,दिनेश परदेशी,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.