सिंदखेड राजा: साखरखेर्डा येथील मंजूर घरकुलधारकांना पहिला हप्ता टाकण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील घरकुल मंजूर झालेल्यांचे अतिक्रमण नियमाकुल करुन पहिला हप्ता रु.15000/- त्वरित वितरित करण्याची मागणी पत्रकार असलम अंजुम, मोहम्मद फयाज यांनी 26 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.मागणी मंजूर न झाल्यास 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.