रामटेक: न. प.रामटेक निवडणूक संदर्भात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घेतली शिवसेनेतर्फे निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची बैठक
Ramtek, Nagpur | Nov 11, 2025 आगामी दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपरिषद रामटेक च्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची बैठक राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबरला रात्री आठ वाजता च्या दरम्यान घेतली. यात न प अध्यक्ष तसेच सदस्य पदाकरता निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची नावे घेण्यात आली. तसेच पुढील निर्णयापर्यंत आपापल्या प्रभागात काम करण्यास सांगण्यात आले.