भूम-परंडा-वाशी मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची रणनीती बैठक; स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीला वेग
प्रतिनिधी : जुबेर शेख
भूम : धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य तसेच विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, विकासकामांची सद्यस्थिती आणि जनतेच्या विविध समस्या यांचा सखोल आढावा घेण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी "गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक" हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला. आगामी काळात गावागावांत संघटनात्मक विस्तार करून शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आमदार तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत यंदाच्या मान्सून हंगामाबाबतही गंभीर चर्चा करण्यात आली. अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसून ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने संभाव्य दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या पेरणीचे नियोजन, पशुधनाचे संरक्षण, चारा उपलब्धता आणि पाणीटंचाई यासंदर्भात विविध सूचना देण्यात आल्या.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, तसेच चारा छावण्यांचे आगाऊ नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे यावेळी आमदार तानाजी सावंत यांच्या वतीने सांगण्यात आले.
याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि मूलभूत सुविधांशी संबंधित कामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीदरम्यान अनेक गावांमधून महावितरणच्या अपुऱ्या व अनियमित वीजपुरवठ्याबाबत तक्रारी समोर आल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित वीज अधिकाऱ्यांना नागरिकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे कडक निर्देश तानाजी सावंत यांनी दिले आहे.
या बैठकीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिवसेना गटनेते संदेश (विकी) चव्हाण आणि जिल्हा परिषद सदस्य सुनील उंदरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
बैठकीला जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, परंडा नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर, भूमचे माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे, भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हाईस चेअरमन केशव सावंत, रामचंद्र घोगरे सर यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
#धाराशिव #बीड #लातूर #विधानपरिषदनिवडणूक #स्थानिकस्वराज्यसंस्था #शिवसेना #भूम #परंडा #वाशी #महाविकास #रणनीतीबैठक #गावतिथेशिवसेना #घरतिथेशिवसैनिक #जनहित #विकासकामे #पाणीटंचाई #मान्सून2026 #एलनिनो #शेतकरी #महावितरण #वीजपुरवठा #ग्रामीणविकास #राजकारण #महाराष्ट्रराजकारण #VeerMaharashtraNews #BreakingNews #MaharashtraNews #OsmanabadNews #PoliticalNews #shivsenanews
Tuljapur, Dharavshiv | Jun 14, 2026