शिरपूर: शिरपूर येथील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी कार्यक्रम उत्साहात संपन्न
Shirpur, Dhule | Nov 26, 2025 शिरपूर शहरातील ऐतिहासिक खंडेराव महाराज मंदिरात तळी भरून चंपाषष्ठी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भाविकांना महाप्रसाद वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी हजारो भाविकांनी मंदिरात खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले.ट्रस्टी मार्फत चंपाषष्ठी कार्यक्रमामुळे संपूर्ण मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.गाभाऱ्यात व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.खंडेराव महाराज मंदिराची ऐतिहासिकता व धार्मिक महत्त्वामुळे मंदिरात श्रद्धाळूजनांनी भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.