बुलढाणा: आता सहनशक्ती संपली,ओला दुष्काळ जाहीर करून मदत तत्काळ द्या - शेतकरी नेते रविकांत तुपकर
आता सहनशक्ती संपली आहे. पुन्हा अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले, सोयाबीन-कापूस वाहून गेला. पुढील ३ दिवसांत "ओला दुष्काळ" जाहीर करून मदत तत्काळ द्या असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता व्यक्त केले आहे.