जागतिक स्तरावर युद्धाचे ढग दाटलेले असतानाच, त्याचे थेट पडसाद आता नागपूरच्या गॅस बाजारपेठेत उमटताना दिसत आहेत. शहरात सध्या घरगुती गॅस सिलेंडराचा तुटवडा जाणवत असून, अनेक गॅस एजन्सींच्या गोदामाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्ष चित्र मात्र पूर्णपणे विरुद्ध आहे.