हिंगणा: हिंगणा -टाळघाट रस्त्यांच्या खड्ड्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ-विजय मोहिते, सामाजिक कार्यकर्ते
#अपघात #रस्ते
Hingna, Nagpur | Oct 20, 2025 हिंगणा–कान्होलीबारा रस्ता खड्डेमय; वाढते अपघातांचे प्रमाण चिंताजनक!हिंगणा : हिंगणा–कान्होलीबारा मार्गावरील रस्ता सध्या अतिशय दयनीय अवस्थेत असून ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनधारक प्रवास करतात, परंतु खड्डेमय रस्त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अलीकडच्या काही दिवसांत या रस्त्यावर अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गाने प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असूनही अद्याप रस्ता दुरुस्तीचे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही.