गुंडेवाडी येथील ग्रामपंचायतमध्ये बनावट पावत्या वापरून कर वसुली करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार दि. 13 डिसेंबर 2025 रोजी दु. 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नारायण दगडुजी गजर रा.गुंडेवाडी,ता.जि. जालना यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार,गुंडेवाडी गावाचे सरपंच मनोहर ज्ञानेश्वर पोटे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे बनावट पावती पुस्तक छापून कर वसूल केला होता.