करवीर: पैसा हा विषय गौण ; शाही दसऱ्याची ओळख जगासमोर व्हावी यासाठी आमचा प्रयत्न - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
पैसा आपल्यासाठी अजिबात महत्त्वाचा नाही. शाही दसऱ्याची ओळख जगासमोर व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. पैसा हा विषय अतिशय गोड आहे. आमच्याकडे वेगवेगळे फंड आहेत. त्यातून कोल्हापूर शाही दसरा महोत्सवासाठी पैशाची तरतूद करता येईल अशी प्रतिक्रिया आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.