यवतमाळ: जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमात मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळावे या हेतूने राज्य शासनाच्या "राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना" अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.