तालुक्याच्या पूर्व भागात कापूस पिकाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, खासगी कापूस खरेदी करणारे व्यापारी मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करत असल्याने बालमटाकळी येथे शासकीय कापुस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. आठ दिवसात कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर बालमटाकळीत शेतकरी रास्ता रोको करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.