लादवड कोळेकरवस्ती, (ता खेड) येथे गुरुवारी (दि. २७) एका २३ वर्षीय युवकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. केतन श्यामराव कारले असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे. केतन हा टाटा फिकोसा कंपनीत नोकरी करत होता, त्याची पत्नी कुमकुम (वय, २१) यांच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी शुभम संतोष तांबे (वय, २१) आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.