पुलगाव येथील 'केंद्रीय दारूगोळा आगार' म्हणजेच CAD ला यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा COAS (Chief of the Army Staff) युनिट प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान दाखवलेले अदम्य साहस आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन हा सर्वोच्च सन्मान लष्कराकडून देण्यात आला आहे. असे आज 17 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे