चाळीसगाव: रांजणगाव फाटा येथे दुचाकी स्लिप होऊन अपघात; नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे तरुणाला तातडीने मदत
चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव फाटा जवळ आज, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी अंदाजे १०:२५ वाजता एका दुचाकी स्लिप होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नानिज्धाम यांच्या २४ तास विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेमुळे तातडीने मदत मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त तरुणाचे नाव गोरख मदन राठोड (वय २५, रा. लोणचे) असे आहे. गोरख राठोड यांची दुचाकी स्लिप झाल्याने हा अपघात झाला.