पाथर्डी: असा पाऊस कधी पाहिलाच नाही ! गल्ली-बोळांना नद्यांचे स्वरूप तर दोघांचा मृत्यू..!
पाथरडी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. तर शेकडो नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला. तर शेती जमिनी घरे दुकाने जनावर आणि रस्त्यांच कोट्यावधींच नुकसान झाले. टाकळी माणूर येथील गणपत बर्डे आणि माणिक दौंडी परिसरातील लांडकवाडी येथील राजू बजरंग साळुंके हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. करंजी जवखेडे हनुमान टाकळी येथील 127 नागरिकांना