तळा: नगरपंचायतीकडे ३९ लाखांपैकी २३ लाख रुपये घरपट्टी जमा; नगराध्यक्षा माधुरी घोलप यांची माहिती
Tala, Raigad | Apr 13, 2024 तळा नगरपंचायतीकडे ३९ लाखांपैकी २३ लाख रुपये घरपट्टी जमा झाली असल्याची माहिती तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी घोलप यांनी शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी दिली. तसेच ज्या नागरिकांची घरपट्टी भरणे अद्यापही बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपली घरपट्टी भरावी अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आवाहनही नगराध्यक्षा माधुरी घोलप यांनी यावेळी केले.