राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस सौ. मेघाताई सुनिल बिसेन यांची गोंदिया जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री रविकांत खुशाल बोपचे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी व महिलांचा सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी मेघा बिसेन यांच्यावतीने नियोजनबद्ध कार्य होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे.