"प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करिता मिळालेला पुरस्कार हा आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी,आशा यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचे फळ"
श्री.रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
205 views | Sindhudurg, Maharashtra | Oct 27, 2025 छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आरोग्य समितीची सभा संपन्न झाली यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व आरोग्य कार्यक्रमांचा आढावा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला व कामाची अपेक्षित पातळी साधण्याचे आवाहन केले. यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मिळालेल्या पुरस्कारा बाबत सर्व अधिकारी व कर्मचारी, आशा यांचे त्यांनी अभिनंदन केले.