एटापल्ली: एटापल्ली तालुक्यातील हालूर च्या महिलांनी पारित केला गावात दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पूरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हालूर गावातील ग्रामस्थांनी एकमुखाने गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला असून यामध्ये विशेषतः महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावातील महिलांनी, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) च्या प्रेरणेने आणि पाठिंब्याने, सदर निर्णय घेण्यात आला.