भंडारा: पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीला अज्ञात ट्रकची धडक, शेतकऱ्याचा मृत्यू ; दिवान खैरी जवळील घटना
पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे निघालेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. यात दुचाकीचालक शेतकरी दिलीप मारुती हेमणे (६२, उमरी चौरास) यांचा मृत्यू झाला, तर मागे बसलेले हरीदास रघुनाथ सावरबांधे (६९) हे जखमी झाले. हा अपघात १५ सप्टेबर रोजी दुपारी १:३५ वाजता आसगाव-पवनी मार्गावरील दिवाण खैरी फाटा कॅनलजवळ मोहरकर पेट्रोल पंपालगत घडला. दिलीप हेमणे आणि रघुनाथ सावरबांधे हे दोघेही दोन्ही पंचायत समिती येथून एकाच दुचाकीवरून (एमएच ३६ / जे ८१९७) उमरीकडे जात होते.