गोरेगाव: ग्राम पंचायत निंबा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन
नांक 17 सप्टेंबर 2025 रोज बुधवार ला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याबाबत विशेष सभेचे आयोजन सरपंच वर्षाताई विजय पटले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भजनी मंडळ यांच्या माध्यमातून विविध समाज जागृत भजन गायन करण्यात आले. ग्रामसभेला मार्गदर्शन सरपंच वर्षा पटले यांनी सांगितले की आजपासून या अभियानाची सुरुवात झाली असून ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहे.