मराठा समन्वयक विदुर लागडे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून मराठा समाजाला काहीच नाही भेटले
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 3, 2025
आज दिनांक 3 ऑक्टोंबर दुपारी चार वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून मराठा समाजाला काहीही लाभ झाला नाही, उलट इतर समाजांना फायदा झाला असल्याचा आरोप मराठा समन्वयक विदुर लागडे यांनी केला आहे. पोलीस पाटील निवडीत गेल्या ७० वर्षांत मराठा समाजाला संधी न मिळाल्याचे सांगत, या आंदोलनाचा फायदा मुसलमान आणि ब्राह्मण समाजाला झाला, असे ते म्हणाले. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा लागडे यांनी दिला.