सेलू: आमगाव फाट्यावर अवैध दारू वाहतूक प्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसांची धडक कारवाई; ₹८२,५०० चा मुद्देमाल जप्त, २ आरोपी ताब्यात
Seloo, Wardha | Nov 24, 2025 पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथील पथकाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध धडक कारवाई करत सुमारे ₹८२,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दिनांक २३ नोव्हेंबर रविवारी सायंकाळी ५.३० वाजता आमगाव फाटा परिसरात करण्यात आली. कार्तिक राजू तिजारे (वय १९) आणि अक्षय गणेश तिजारे (वय २१) दोघेही रा. तुळजापूर, दहेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अशी माहिती ता. २४ ला सिंदी पोलिसांनी दिली.