कुरखेडा: गेवर्धा-अरततोंडी मार्गावर दोन दूचाकीची समोरा समोर धडक १ ठार तर २ गंभीर जखमी
गेवर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखेजवळून अरततोंडी कडे जाणार्या मार्गावर दोन दूचाकीची समोरा समोर झालेल्या भिषण धडकेत एक दूचाकी चालक ठार तर दूसर्या दूचाकी चालकासह एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटणा आज दि.१७ सप्टेबंर बूधवार रोजी सकाळी ११ वाजेचा सूमारास घडली.अपघातात दूचाकी चालक चरणदास गोमा उसेंडी रा.भगवानपूर वय ५८ यांचा मृत्यु झाला तर दूसर्या दूचाकी वरील चालक प्रितम नैताम रा.वासी व जनाबाई नैताम रा.रावणवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत.