'पोलीस रेझिंग डे' निमित्त दिघोरी मोठी येथील पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पोलीस शस्त्र प्रदर्शनीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तावशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्याला भेट देऊन आधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती जाणून घेतली. पोलीस प्रशासनाच्या वतीने ७ जानेवारी रोजी या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.