साकोली: एम.बी.पटेल कॉलेजच्या परिसरात डुकरांचा धुमाकूळ,डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
साकोली येथील एम.बी. पटेल कॉलेजच्या रोडवरील न्यायालयाच्या बांधकामासाठी ठेवलेल्या रिकाम्या जागेत डुकरांचा धुमाकूळ सुरू आहे.हा नागरी वस्तीचा भाग आहे.ही डुकरे नागरिकांच्या घरातही शिरतात त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गजभिये व नागरिकांनी शनिवार दि.18 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता साकोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे