धुळे: बाहेरून आलेल्यांना नव्हे, निष्ठावंतांनाच उमेदवारी द्या"; भाजप माजी उपमहानगराध्यक्ष ॲड. अमित दुसाने, देवपूर साधला संवाद
Dhule, Dhule | Nov 9, 2025 धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामधील निष्ठावंत नाराज असून, पक्षात बाहेरून आलेल्यांना नव्हे, तर ३० ते ३५ वर्षांपासून काम करणाऱ्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत लवकरच निष्ठावंतांची बैठक घेऊन वरिष्ठांना पत्र दिले जाईल. तरीही पक्षाने संधी न दिल्यास स्वतंत्र निर्णय घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा भाजपचे माजी उपमहानगराध्यक्ष ॲड. अमित दुसाने यांनी दिला. त्यांनी देवपूर परिसरात माध्यमांशी संवाद साधला.