देवळी: रत्नापूर गावात विकासकामांचा 'श्रीगणेशा': आमदार बकाने, माजी खासदार तडस यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात
Deoli, Wardha | Oct 13, 2025 देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील रत्नापूर गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला असल्याचे आज 13 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता प्रसिद्धीस दिले.वर्धा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. देवळी-पुलगावचे आमदार राजेश बकाने, वर्ध्याचे माजी खासदार रामदासजी तडस यांच्यासह अनेक मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते