लातूर- देहू-आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यासह भावीक भक्तांना एमआयटी पुणे आणि कराड परिवाराच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी वाखरी येथील एमआयटी परिसरात महाप्रसाद लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांच्या हस्ते आज देण्यात आला. अशी माहिती आज दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आमदार रमेश आप्पा कराड यांच्या लातूर येथील संवाद संपर्क कार्यालयातून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.