तळा: तळा:तळा बाजारपेठ येथे श्री राम नवमी उत्साहात साजरी.
Tala, Raigad | Apr 17, 2024 तळा शहरातील तळा बाजारपेठ येथे बुधवार दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान श्री राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी तळा बाजारपेठ ते श्री राम मंदिर वडाची वाडी अशी श्री रामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेवक रितेश मुंढे, मी शिवभक्त प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमित रेडीज यांसह तळा तालुक्यातील राम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.