आज दिनांक 13 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की तालुक्यातील रहिमपूर फाटा परिसरात आजभरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे रहिमपूर फाटा परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. सदरील घटनेतील जखमींचे नाव स्पष्ट नसून पुढील तपास वाळूज पोलीस हे करत आहेत .