नरखेड: सावधान! पोस्ट खात्यातील पैसे चक्क पोस्टमार्टरनेच केले लंपास : सागर दुधाने यांनी दिली सविस्तर
आपल्यापैकी अनेकांचे खाते पोस्टात असते. आपण विश्वासाने त्यात पैसे जमा करतो किंवा अनेक शासकीय योजनांचेही पैसे त्यामध्ये जमा होत असतात. परंतु चक्क पोस्टमास्टरनेच या पोस्टाच्या खात्यातील पैसे लंपास केल्याची धक्कादायक घटना काटोल व नरखेड तालुक्यातून उघडकीस आली आहे. दरम्यान सर्वांनी खाते चेक करा असे आवाहन सागर दुधाने यांनी एक नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता केले आहे.