कन्नड: कन्नड तालुक्यात २४ तासांत ८३.६ मि.मी. पावसाची नोंद; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कन्नडसह परिसरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावातील अनेक शेतात पाणी शिरल्याने आले, मका, कापूस, भुईमूग या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.