स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आरक्षणाबाबत नव्याने केस दाखल झाली आहे. अंतिम निर्णय काहीही आला तरी आपण कामाचा वेग कमी न करता जोमाने पुढे जायचे आहे, असा संदेश राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी नगरधन येथे गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबरला सायंकाळी आठ वाजता च्या दरम्यान आयोजित शिवसेना कार्यकर्ता संवाद आढावा बैठकीत केला. यावेळी मंचावर रामटेक तालुकाप्रमुख विवेक तुरक,माजी जि. प. सभापती वर्षा धोपटे, माजी जि. प. सदस्य नरेश धोपटे,संजय झाडे सहित पदाधिकारी उपस्थित होते.