नागपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व कायम राखत दणदणीत विजय संपादन केला आहे. जनतेने दाखवलेला हा विश्वास म्हणजे विकासाच्या राजकारणाची पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बेझनबाग येथील काँग्रेस कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.विविध प्रभागांतून काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.