कोपरगाव: ओबीसी नेते यांच्याकडून अवमानकारक विधान, मराठा समाज बांधवाकडून तहसील व पोलीस प्रशासनास निवेदन
सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकल मराठा समाज, कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात निवेदन देऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर अवमानकारक विधानप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. १२ सप्टेंबर रोजी शिरूर येथील सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला उद्देशून “तुम्ही आता ओबीसीमध्ये आलात, पहिले ११ विवाह आपल्यात ठरवू या, पाटील ९६ कोळी क्षेत्रीय राहिलात का?” असे अवमानकारक विधान केले होते.